गरोदरपणाच्या चाचणीसाठी लागणारे डॉपलर मशीन स्त्रीरोग तज्ञ डॉ.संजीवनी गुणे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रदान...
डॉ.संजीवनी गुणे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रदान..
पनवेल /  वार्ताहर   : - 
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल हा क्लब पनवेल मधील प्रथितयश डॉक्टरांच्या सहभागामुळे आणि क्लबमधून केल्या जात असलेल्या वैद्यकीय प्रकल्पांसाठी नावाजलेला क्लब म्हणून ओळखला जातो. वर्षभर अनेक सामाजिक वैद्यकीय प्रकल्प या क्लबमार्फत राबवले जातात. यंदा रोटरी वर्ष 24-25 चे मेडीकल डायरेक्टर माजी अध्यक्ष रो. डॉ. लक्ष्मण आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे वैद्यकीय प्रकल्प राबवले जात आहेत. या अंतर्गतच दिनांक 25 जुलै रोजी पनवेल आरोग्य प्राथमिक केंद्र क्रमांक 1 येथे, सुदृढ माता सुदृढ बालक या जाणिवेतून, गरोदर स्त्रियांना प्रोटीनची अधिक मात्रा असलेले पौष्टिक खाद्यपदार्थ क्लबतर्फे देण्यात आले. तसेच गरोदर पणातील चाचणीसाठी लागणारे डॉपलर मशीन पनवेलमधील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ रो. डॉ. संजीवनी गुणे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संचालिका डॉ. रेहाना मुजावर यांना प्रदान करण्यात आले. 
याप्रसंगी क्लबचे मेडीकल डायरेक्टर रो डॉ. लक्ष्मण आवटे यांच्यासह इतर रोटेरियन्स आणि ॲन्स उपस्थित होते.
या प्रोजेक्टच्या सांगतेनंतर लगेचच उपस्थित सर्व रोटेरियन्स नी डिस्ट्रीक्टच्या 'छत्रछाया' या प्रोजेक्ट अंतर्गत रस्त्यावरील, तसेच बाजारपेठेतील गरीब गरजू विक्रेत्यांना ऊन पावसापासून संरक्षक अशा मोठ्या छत्र्यांचे वाटप करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले. मानवता, संवेदना आणि सेवा ही रोटरीची ओळख सार्थ करत आज रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल,तीन समाजोपयोगी उपक्रम करण्यात यशस्वी ठरला.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image