श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद...
श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद...

पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट, आम्ही रक्तदाते पनवेलचे, पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट, आणि एमजीएम हॉस्पिटल कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने 16 जून 2024 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन पूज्य श्री सिंधी पंचायत हॉल पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी 75 जणांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पनवेल मधील डॉक्टर ययाती गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  राजू सचदेव, दौलत सचदेव, ऍड मनोहर सचदेव,  देवानी, ऍड अमोल साखरे, मुलरीधर डाके, भूषण चोणकर इत्यादी उपस्थित होते. या रक्तदान शिबिराच्या बरोबरीने डॉ बाठीया यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. या आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. एकूण 75 रक्तदात्यांनी यात आपला सहभाग नोंदवला.


फोटो ः रक्तदान शिबीर
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image