जबरी चोरीचा गुन्हा खांदेश्वर पोलिसांनी केला उघडकीस ; चार आरोपीसह रिक्षा हस्तगत .
जबरी चोरीचा गुन्हा खांदेश्वर पोलिसांनी केला उघडकीस ; चार आरोपीसह रिक्षा हस्तगत 


पनवेल वैभव /दि. ०३ ( संजय कदम ) : जबरी चोरीचा गुन्हा खांदेश्वर पोलिसांनी उघडकीस आणला असून त्या प्रकरणी पुणे येथून चार आरोपीना अटक करून त्यांच्याकडून 50,000/- किमतीची रिक्षा ही हस्तगत करण्यात आली आहे.
                विष्णू कुमार नेमी चंद्र वय ( २४ ) रा. नेरुळ याच्या रिक्षात चार अनोळखी इसम नेरुळ येथून बसले व खांदा कॉलनी सिग्नलच्या जवळ त्यांनी  ब्रिज खाली रिक्षा थांबवून रिक्षा चालकाला भाडे न देता तसेच त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्या ताब्यात असलेली ५०. ००० /-  रुपये किमतीची रिक्षा जबरदस्तीने चोरून नेल्याने याबाबतची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करताच पोलीस उप आयुक्त परि 02, विवेक पानसरे , सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग अशोक राजपुत, यांचे आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि समीर चासकर, पो ह महेश कांबळे, धीरेंद्र पाटील, उदय देसाई, पोशि सचिन पवार, सचिन सरगर, स्वप्निल कोळी यांनी तांत्रिक तपास व गुप्तबातमीद्वारा अधिक शोध घेतला असता या गुन्ह्यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली त्यानुसार शोध घेत असताना हे चारही जण रिक्षासह पुणे येथे लपल्याची माहिती मिळाली . त्यानुसार या पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून चारही जणांना रिक्षासह ताब्यात घेतले आहे . यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सुद्धा समावेश आहे .
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image