दोन ट्रेलरच्या अपघातात चालकाचा मृत्यू...
दोन ट्रेलरच्या अपघातात चालकाचा मृत्यू...


पनवेल दि.(संजय कदम): पनवेल जवळील जे.एन. पी.टी. ते पळस्पे रोडवर करंजाडे व डोबाळे कॉलेज कॉसींग ब्रिजवर झालेल्या दोन ट्रेलरच्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
         ट्रेलर कमांक-एम.एच.४६ बी.एफ. २५७६ वरील चालक याने त्याचे ताब्यातील ट्रेलर बेदरकारपणे, हयगयीने व अविचाराने चालवुन त्याचे समोर असलेल्या ट्रेलर कमांक एम. एच.०४ जी.आर. ९३७६ ला ठोकर मारून सदर ट्रेलर वरील चालक सचिन महेश कुमार वय-२२ वर्षे रा. शहागंज, जौनपुर याच्या अंगावरून ट्रेलरचे चाक गेल्याने त्यास किरकोळ व गंभीर दुखापती होवून त्याचे मृत्युस व दोन्ही वाहनांचे नुकसाणीस कारणीभुत झाला आहे तसेच अपघताची खबर न देता व जखमी इसमास वैदयकीय मदत न करता पळुन गेला आहे म्हणुन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments