घरफोडी करणारे २ आरोपी गजाआड...
घरफोडी करणारे २ आरोपी गजाआड...


पनवेल वैभव / दि.०२(संजय कदम): तालुक्यातील ओवळेगावात एका किराणा मालाचे दुकानाचे शटर उचकटून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा १ लाख ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल २ अज्ञात चोरांनी चोरून नेला होता. या प्रकरणी २ आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. 
        सुनील दिनकर चव्हाण (वय 19) आणि वंश कालिदास भोरे (वय 21) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तालुक्यातील ओवळे गावात या आरोपींनी अंधाराचा फायदा फिर्यादीच्या किराणा मालाच्या दुकाणाचे लोखंडी शटर उचकटुन आतमध्ये प्रवेश करून ४५ हज रुपये किमतीची सोन्याची अंगठी, ३० हजार रुपये किमतीची बोरमाळ, २००० हजार रुपये रोख आणि ३० हजार रुपये किमतीची पॅशन प्रो मोटार सायकल चोरून नेली होती. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोहवा नितीन वाघमारे, पोहवा परेश म्हात्रे, पोना रविंद्र पारधी, पोना विनोद देशमुख, पोशि प्रसाद घरत, पोशि नितीन कांबळे आणि पोशि साईनाथ मोकल यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले आहे.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image