पनवेल तालुका पोलिसांनी गणेश विसर्जनावेळी ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहाण्याचे संदेश देणारे फलक लावून जनजागृती..
  संदेश देणारे फलक लावून जनजागृती...


पनवेल, दि.1 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील गणेशाचे विसर्जन अत्यंत धार्मिकतेने व सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्रितपणे येवून ढोल ताशाच्या गजरात नृत्य करत करण्यात आले. यावेेळी ऑनलाईन होणार्‍या फसवणुकीपासून सावध रहा असे संदेशही जनजागृती फलक लावून देण्यात आले.

सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या सहभागाने वपोेनि अनिल पाटील, वपोनि जगदीश शेलकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात विराजमान झालेेल्या गणेशाची आरती करून शहरातील बल्लाळेश्‍वर मंदिर येथे विसर्जनासाठी मिरवणुक काढण्यात आली. सदर मिरवणूूक काढताना सुद्धा पोलिसांनी प्रथम नागरिकांचा विचार केला. या मिरवणुकीच्या माध्यमातून चांगला संदेश जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्याांनी ऑनलाईन होणार्‍या फसवणुकीपासून सावध रहा असे संदेश देणारे फलक गाड्यांना लावून त्याद्वारे जनजागृती केली. यावेळी या विसर्जनात सर्व पोलीस बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. गेले 12 दिवस बंदोबस्तामुळे दमलेले, थकलेले पोलीस बांधवानी या विसर्जनाच्या वेळी मोठ्या उत्साहात सहभागी होवून पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष आपला आनंद द्विगुणीत केला. 



फोटो ः तालुका पोलीस ठाण्याची जनजागृती मोहिम
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image