उरण महाविद्यालयाच्या कु. रूपाली सपकाळ ची पीएसआय पदी निवड..
उरण महाविद्यालयाच्या कु. रूपाली सपकाळ ची पीएसआय पदी निवड...



उरण दि 5(विठ्ठल ममताबादे )कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाची  कु. रूपाली सोनू सपकाळ या विद्यार्थिनीची एम.पी.एस.सी द्वारे झालेल्या परीक्षेतून पीएसआय पदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे महिला प्रवर्गातून ती महाराष्ट्र राज्यात प्रथम आली आहे. उरण महाविद्यालयाची ती इतिहास विषयाची पदवीधर विद्यार्थिनी आहे. तिच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बळीराम एन. गायकवाड,  के.ए.शामा, डॉ. ए.आर चव्हाण, डॉ.एम.जी लोणे, डॉ.दत्ता हिंगमिरे,  टी. एन घ्यार व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तिच्या या यशामध्ये तिचे आई-वडील,मामा व शिक्षकांचे मार्गदर्शन, प्रेरणा व प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले असे तिने सांगितले.
Comments
Popular posts
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
स्वीकृत नगरसेवक पदी प्रथमेश सोमण यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
Image