खारघर से.३४ फरशीचापाडा येथील जिल्हा परिषद शाळेला भूखंड उपलब्ध करून देण्याची प्रितम म्हात्रे यांची मागणी...
 प्रितम म्हात्रे यांची मागणी....

पनवेल / प्रतिनिधी -  : स्मार्ट शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर शहरात गरिबांच्या शिक्षणाची दुरवस्था झालेली दिसून येत आहे. खारघर सेक्टर ३४ येथील फरशीचापाडा गावातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. गळके छत, पावसाच्या पाण्याने वर्गात होणारा चिखल, अंधाराचे साम्राज्य यामुळे येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि शिक्षण देणारे शिक्षक यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे खारघर से. ३४ फरशीचापाडा येथील जिल्हा परिषद शाळेला भूखंड उपलब्ध करून देऊन शाळेचे पुर्नवसन करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची मागणी पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
      येथील शाळा ही धोकादायक स्थितीत असल्याने भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू शकते. ही शाळा खासगी मालकीच्या जागेत असल्याने दुरुस्ती साठी पनवेल महानगरपालिका परवानगी देत नसल्याने जिल्हा परिषदेकडून आलेला निधी परत गेला आहे. त्यामुळे शाळेची दुरुस्ती न केल्याने आज धोकादायक स्थितीत शाळा आहे. याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. स्मार्ट विजन ठेवणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात शाळेची ही दुरवस्था झाली असल्याने पनवेल महानगरपालिकेने या शाळेसाठी नवीन भूखंड उपलब्ध करून या शाळेचे पुनर्वसन करण्यात यावे. तसेच तात्पुरता खारघर प्रभाग कार्यालयात शाळा स्थलांतरित करण्यात यावी. अशी मागणी पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image