शिवसेनेच्या पाठपुराव्याने स्ट्रीट लाईट व विजेचा पुरवठा सुरळीत...
शिवसेनेच्या पाठपुराव्याने स्ट्रीट लाईट व विजेचा पुरवठा सुरळीत...
पनवेल दि.३० (वार्ताहर) : शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे पनवेल शहरातील कुंभारवाडा येथील संत गोरा कुंभार मंदिर परिसरातील स्ट्रीट लाईट तसेच कुंभार वाडा मधील विजेचा पुरवठा सुरळीत झाला आहे. या कामाचे लोकार्पण शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. 
            पनवेल शहरातील कुंभारवाडा येथील संत गोरा कुंभार मंदिर परिसरातील स्ट्रीट लाईट तसेच कुंभार वाडा मधील नवनाथ मंदिर जवळ बसवलेले हॉल्टेज चा सुरळीत पुरवठा होण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून दोन्ही कामे यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त याकामाचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनवणे, पनवेल शहर संघटक अभिजित साखरे, उपशहर प्रमुख मचींद्र झगडे, वार्ड क्रमांक १४ चे विभाग प्रमुख आशिष पनवेलकर, शाखाप्रमुख किरण कळवेकर, उप शाखाप्रमुख प्रतिक वाजेकर, युवासेना प्रमुख रितेश पनवेलकर, शाखा प्रमुख ओंकार पनवेलकर आदी शिवसैनिक व कुंभार वाड्यातील तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.




फोटो : शिवसेनेच्या पाठपुराव्याने स्ट्रीट लाईट व विजेचा पुरवठा झाला सुरळीत
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image