शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या प्रयत्नाने गटारांच्या साफसफाईच्या कामाला सुरुवात ...
गटारांच्या साफसफाईच्या कामाला सुरुवात ...

पनवेल / दि.१४ (संजय कदम) :  शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या प्रयत्नाने कळंबोली सेक्टर- 5 बाबा गार्डन येथील गटारांच्या साफसाईच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. याबाबत स्थानिक रहिवाश्यांनी रामदास शेवाळे यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.  
कळंबोली सेक्टर- 5 बाबा गार्डन येथील गटारांमध्ये अनेक दिवस साफसफाई न केल्याने गटारामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून मच्छरांचा देखील प्रादुर्भाव वाढला होता. सदर बाब स्थानिक रहिवाश्यांनी शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या निदर्शनास आणून दिली. रामदास शेवाळे यांनी तात्काळ पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ती लवकरात लवकर साफ व्हावीत याबाबतीत पाठपुरावा सुरु केला. अखेर रामदास शेवाळे यांच्या प्रयत्नाने कळंबोली सेक्टर- 5 बाबा गार्डन येथील गटारांच्या साफसाईच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. याबाबत स्थानिक रहिवाश्यांनी रामदास शेवाळे यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.
फोटो : रामदास शेवाळे यांच्या प्रयत्नाने गटारांच्या साफसफाईला सुरुवात
Comments