नवीन पनवेल मध्ये मटण-मच्छी विक्रेत्यांसाठी मार्केटची सोय करा ; मा.नगरसेवक मनोज भुजबळ यांचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन....
मा.नगरसेवक मनोज भुजबळ यांचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन....

पनवेल / दि. २१ (संजय कदम) : नवीन पनवेल मध्ये काही बेकायदेशिर मच्छी-मटण विक्रेते फूटपाथवर बसून विक्री करत असून याचा नाहक त्रास नियमित व नियमाने मार्केटमध्ये बसून मच्छी-मटण विक्री करणाऱ्यांना होत आहे. त्यामुळे बाहेर फूटपाथवर बसून मच्छी-मटण विक्री करण्यांना मज्जाव करावा तसेच त्यांच्यासाठी मार्केटमध्ये बसण्यासाठी सोय करुन दयावी अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मनोज भुजबळ यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे.  
या निवेदनात मनोज भुजबळ यांनी म्हटले आहे कि, सिडकोने नविन पनवेलची रचना करताना कोणत्याही मुलभूत सोयी सुविधांचा विचार न करता नविन पनवेलची उभारणी केली. त्यामुळे प्रत्येक सेक्टरमध्ये सार्वजनिक भाजीमार्केट, फळमार्केट, फूलमार्केट, मच्छीमार्केट व मटण मार्केटची सुनियोजित रचना केलेली नाही. यामुळे परिसरातील सर्व रस्त्यांचे फूटपाथ फेरीवाल्यांनी व्यापलेले आहेत. नवीन पनवेल सेक्टर 12 येथे मच्छी मार्केट असून तेथे कायदयाने पालन करुन मच्छी विक्रेते बसत आहेत. परंतु बेकायदेशिर फूटपाथवर बसून मच्छी विक्री करणाऱ्यांमुळे नियमित व नियमाने मार्केटमध्ये बसून मच्छी विक्री करणाऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच मच्छी मार्केटच्या शेजारी सिडकोने मटण मार्केट बांधलेले आहे मात्र सध्या हे मार्केट बंद पडून असून तेथे दलदल माजलेली आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेने संपूर्ण नविन पनवेल मधील मटण-चिकण व मच्छी विक्रेते यांना एकाच छताखाली बसण्याची सोय उपलब्ध करून दयावी जेणेकडून शहराचे विद्रुपीकरण थांबेल व नागरिकांचे गैरसोय होणार नाही.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image