मानसरोवर कॉम्प्लेक्सचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मा.नगरसेवक विकास घरत यांचा सत्कार...
मा.नगरसेवक विकास घरत यांचा सत्कार...

पनवेल / दि.२० (संजय कदम) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाची महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. या जयंती निमित्त मानसरोवर येथे जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न पनवेल महापालीकेचे माजी नगरसेवक विकास घरत यांनी मार्गी लावल्याबद्दल मानससरोवर कॉम्प्लेक्सचावतीने सत्कार करण्यात आला.
मानससरोवर कॉम्प्लेक्सचा प्रश्न गेल्या १२ ते १५ वर्षांपासून प्रलंबित होता. या प्रश्नाबाबत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेवक विकास घरत यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून मार्गी लावला आहे. याबद्दल  मानसरोवर कॉम्प्लेक्सच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये माजी नगरसेवक विकास घरत यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माजी नगरसेवक विकास घरत यांनी सांगितले कि, या इमारतीमध्ये अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता. या सोसायटीचे पदाधिकारी यांनी ह्या समस्येबद्दल मला सांगितले. याबाबत मी संबंधित खात्याकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार करून हि समस्या सोडवली. आगामी काळात सुद्धा आपल्या सोसायटीत कोणतेही अडचण आल्यास आपल्या मागे खंबीरपणे उभे राहीन अशी ग्वाही विकास घरत यांनी दिली.       




फोटो : विकास घरत सत्कार
Comments