वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र रंगनाथ दौंडकर यांना गुणवत्तापूर्ण सेवेकरिता राष्ट्रपती पदक..

गुणवत्तापूर्ण सेवेकरिता राष्ट्रपती पदक

 

पनवेल /वार्ताहर -  : पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र रंगनाथ दौंडकर यांना गुणवत्तापूर्ण सेवेकरिता राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. खेड तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.

             रविंद्र दौंडकर यांचे वडील स्वर्गीय .ह.भ.प.रंगनाथ बाबा दौंडकर हे वारकरी संप्रदायात कार्यरत होते, त्यामुळे संस्काराची शिदोरी त्यांना बालपणीच मिळाली. बीकॉम पदवी घेतल्यानंतर रविंद्र दौंडकर हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा प्रथम प्रयत्नात महाराष्ट्रात ५०व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पोलीस उपनिरीक्षकपदी त्यांची निवड झाली. महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे खडतर प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनगोवंडी येथे १९९६ साली सेवेत रूजू झाले. आजतागायत मुंबईठाणेपुणेअँटी करप्शन ब्युरो, ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात त्यांनी आतापर्यंत 28 वर्ष कर्तव्य बजावले आहे .रविंद्र दौंडकर यांनी पोलीस खात्यातील सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून नावलौकिक मिळविला आहे. पोलीस सेवेत असताना कायद्याचे सखोल ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने त्यांनी एल.एल.बी व एल.एल.एम या पदव्याही संपादन केल्या आहेत.

            कनेरसर गावातील अनेक धार्मिकशैक्षणिकसामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान असते. पोलीस खात्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना 500 पेक्षा जास्त बक्षीसे व प्रशंसापत्रासहित रोख रक्कम रू.लाख पेक्षा जास्त मिळाली आहे. रविंद्र दौंडकर यांनी अनेक गंभीर गुन्हे आपल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे उघडकीस आणलेले आहेत. त्यामुळे तत्कालीन स्वर्गीय गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते बेस्ट डिटेक्शन ऑफीसर म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता. मुंबईठाणे व नवी मुंबईतील संवेदनशील अशा विविध पोलीस स्टेशनमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. २००८ साली सहाय्यक पोलीस निरीक्षक व २०१३ साली पोलीस निरीक्षकपदी त्यांची पदोन्नती झाले. ठाणे येथे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे प्रमुख म्हणून कार्यरत असताना बांगलादेश, नेपाळ वा इतर देशांतून मुंबई येथे होत असलेला अनैतिक मानवी वाहतूक बाबींचा व्यापार याबाबत कठोरपणे कारवाई केली. आपल्या आजपर्यंतच्या कार्यकाळात रविंद्र दौंडकर यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना जेरबंद केले व त्यांचेविरुद्व सबळ पुराव्यानिशी दोषारोपपत्र दाखल करून दोषसिद्धी मिळविली आहे. कर्तव्य कठोर परंतु समाजासाठी तळमळ व्यक्त करणारे दौंडकर हे सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच सहभागी होतात. कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने मुंबईतून लोक मोठ्या संख्येने बाहेरगावी जात होते. रविंद्र दौंडकर तेव्हा वाशी पोलीस स्टेशनला कार्यरत होते. त्यांनी लोकांसाठी बिस्किटेफळे,खाद्यपदार्थ याचे वाटप वरिष्ठ अधिकारी यांच्या सहकार्याने केले. अत्यवस्थ असलेले अनेक कोरोना पेशंटना त्यांनी तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देऊन त्यांचे प्राण वाचविले आहेत. सॅनिटायजरमास्क, प्रतिबंधक गोळ्या याचे वितरण पोलीस कर्मचारीत्यांचे कुटुंबीय तसेच व्यावसायिकनोकरवर्ग यांना केले.

         रविंद्र दौंडकर यांनाही कोरोनाने गाठले ,त्यावर मात करून ते पुन्हा कर्तव्यावर रूजू झाले.गेली दोन वर्षांपासून ते  पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून जबाबदारी पाहत असताना कोरोना संकटकाळात सर्वतोपरीने नागरिकांमध्ये जनजागृती करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. रविंद्र दौंडकर यांच्या कार्याची दखल वेळोवेळी सामाजिक संस्थांबरोबरच पोलीस खाते व शासनानेही घेतली आहे. १ मे २०१८ रोजी त्यांना पोलीस खात्यातील मानाचे पोलीस महासंचालक पदक मिळाले आहे. पोलीस खात्यामधील  राष्ट्रपती पोलीस पदक हा सर्वोच्च सन्मान आहे. रविंद्र दौंडकर यांना २६जानेवारी २०२१ रोजी गुणवत्तापुर्ण सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलीस मेडल मिळाल्याचे जाहीर झाले व सदर मेडल त्यांना दि.13/10/2022 रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे बहाल करण्यात आले आहे. त्यांच्या सेवाकार्याला उचित असा बहुमान मिळाला. रविंद्र दौंडकर हे खेड तालुक्यातील कनेरसर गावचे रहिवासी असल्याने त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे .

Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image