लोकप्रिय कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव ...
लोकप्रिय कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव ...

पनवेल (प्रतिनिधी) विकासकामांचा डोंगर, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकारण, अशा क्षेत्रातील लोकप्रिय नेतृत्व असलेले भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक हितचिंतकांनी शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले. तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे वडील लोकनेते रामशेठ ठाकूर व आई शकुंतला ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. 
       संघटन कौशल्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणिव असलेले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा आज (दि. ०५ ऑगस्ट) ४८ वा वाढदिवस होता. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत आणि युवकांमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांची क्रेझ कायम पहायला मिळते. आणि ती अफाट लोकप्रियता त्यांनी आपल्या विधायक कार्यातून प्राप्त केली आहे, सलग तीनवेळा आमदार होऊनसुद्धा त्यांच्या वर्तनात कधीही बडेजाव दिसला नाही त्यामुळे त्यांचे लाखोंच्या संख्येने हितचिंतक आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, राजकीय, कला, सांस्कृतिक, वैद्यकीय, विधितज्ज्ञ, पत्रकारिता, विविध संस्था, संघटना, पदाधिकारी व कार्यकर्त्यानी, हितचिंतकांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले.  
       पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे, हि त्यांच्या संघटन कौशल्यातून नेहमीच अधोरेखित झाली आहे. पनवेल त्याचबरोबर जिल्हा किंवा जिल्ह्याबाहेर आलेल्या नैसर्गिक आपत्ती, आपत्कालीन परिस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांनी सढळ हस्ते मदत आणि धीर देण्याचे काम केले असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहे. मात्र हे कार्य त्यांनी कधीही सवंग लोकप्रियता किंवा प्रसिद्धीसाठी केले नाही. माणूस आणि माणुसकी म्हणूनच त्यांच्याकडून विधायक कार्य घडत आले आहे. सर्व क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांचे भरीव योगदान आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वसा त्यांनी सांभाळला आहे. सतत सर्व समाजाच्या विकासाचा ध्यास घेऊन समाजाला कोणती गरज आहे हे लक्षात घेऊन ऊन पावसाची तमा न बाळगता दिवसातून १८- १८ तास काम करीत असतात. आणि हा आदर्श समाजाला प्रेरणादायी ठरला आहे, त्यामुळे वाढदिवसदिनी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. 

चौकट-
अभ्यासू, कार्यतत्पर, आमदार प्रशांत ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त राज्यभरातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर त्यांनी ट्विटरवर ट्विट करूनही अभिष्टचिंतन केले.
Comments