पनवेल ग्रामीण टीमने पटकाविला युवासेना आयोजित पनवेल विधानसभा चषक ..
मुंबई महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या उपस्थितीत विजेत्या टीमला चषक प्रदान..
युवासेना पनवेल विधानसभा अधिकारी पराग शरद मोहिते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून "पनवेल विधानसभा चषक २०२२" चे आयोजन

पनवेल / प्रतिनिधी : - शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मंत्री  आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व युवासेना सचिव, कॉलेजकक्षप्रमुख वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा अधिकारी पराग शरद मोहिते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल पनवेल शहर अधिकारी निखिल भगत, शहर समन्वयक साईसुरज पवार, उपशहर अधिकारी विराज साळवी आणि शाखा अधिकारी जयदीप भगत यांनी अतिशय उत्कृष्टरीत्या नियोजन करून पनवेल विधानसभा चषक२०२२ चे आयोजन केले होते.

युवासेना पनवेल विधानसभेतील सर्व युवासैनिकानी एकत्र यावे आणि एक उत्कृष्ट स्पर्धा पार पडावी या उद्दिष्टाने केलेल्या आयोजनाला बृहन्मुंबईच्या महापौर, रायगड जिल्हा संपर्क संघटिका किशोरीताई पेडणेकर, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख  शिरिष घरत, मा. म्हाडा अध्यक्ष व रायगड जिल्हा सल्लागार बबनद पाटील, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका सिंधुताई मसुरकर, युवासेना सहसचिव व विस्तारक ओमकार चव्हाण, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा संघटिक कल्पनाताई पाटील, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका संघटक रामदास पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा संघटक दिपक निकम, महानगर संघटक प्रथमेश सोमण, युवासेना जिल्हा समन्वयक नितिन पाटील, उपमहानगरप्रमुख  दिपक घरत, उपमहानगरप्रमुख रामदास गोंधळी, उपमहानगर संघटक अच्युत मनोरे, शहर प्रमुख  प्रविण जाधव, शहरप्रमुख सदानंद शिर्के, शहरप्रमुख यतिन देशमुख, शहर संघटक अरविंद कडव, शहर संघटिका अर्चना कुळकर्णी, उपशहर संघटिका सौ. गावडे, उपशहरप्रमुख अनिल कुरघोडे, उपशहरप्रमुख राहुल गोगटे, उपशहरप्रमुख अतुल पलन, उपशहरप्रमुख रोहित टेमघरे, जुनेद पवार, नुरुल्ला वाईकर तसेच शिवसेना पनवेल शहर, शिवसेना खांदा कॉलनी शहर व शिवसहाय्य पनवेल आणि एक हात मदतीचा ह्या जनतेच्या मदतीसाठी तत्पर असलेल्या समाजसेवी संस्थाचे सन्माननीय पदाधिकारी व मित्रमंडळी उपस्थित होते.

याप्रसंगी ग्रामीण तालुका अधिकारी केवल माळी यांची "पनवेल ग्रामीण टीम स्पर्धेची विजेती ठरली". तर उपविजेतेपद हे उपविधानसभा अधिकारी महेश भिसे यांच्या कामोठे संघाने पटकावले.
पनवेल, नविन पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी, प्रभाग २०, कामोठे आणि तळोजे ह्या शहरांमधे पार पडलेल्या सामन्यांचे पारितोषिक वितरण सन्माननीय महापौर किशोरीताई पेडणेकर, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका सिंधुताई मसुरकर, युवासेना विस्तारक ओमकार चव्हाण इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पार पडले. मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करत युवासेनेची एक चांगली फळी पनवेल विधानसभेत तयार झाल्याचे गौरवोद्गार काढले.

सदर सामन्यांच्या नियोजन व आयोजनात प्रणव लबडे, सतिश पाटील, मंदार भगत, मंगेश भगत, निखिल दिघे, जय कुष्टे, जितेंदर सिद्धू, अमेय ठाकरे, प्रथम ठाकरे, ऋषिकेश सोगे, चंद्रकांत सूर्यवंशी, आबेश ओंबळे, सिद्धेश गुरव, कोमल कुरघोडे, सौरभ म्हामुणकर, कुणाल साळवी, स्वराली सावंत, प्रितम यादव, सिद्धेश मोकल, प्रणव पलन आदीनी हातभार लावला. संपूर्ण सामन्यांमधे कुशल भगत यांनी अतिशय अचूक व उत्कृष्ट नियोजन केले.
Comments