खारघर येथील उत्तरभारतीयांचे प्रमुख पदाधिकारी शैलेश त्रिपाठींसहित कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

पनवेल / वार्ताहर  :-  शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर प्रेरित होऊन, शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड पनवेल  शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली तसेच पनवेल महानगर समन्वयक  गुरुनाथ पाटील यांच्या प्रयत्नाने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे खारघर शहरातील उत्तर भारतीयांचे प्रमुख पदाधिकारी शैलेंद्र त्रिपाठी यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यानी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, शिवसेना उत्तर भारतीय सेल अध्यक्ष सी.पि. प्रजापती, गिरीश गुप्ता, कळंबोली शहर समनव्यक गिरीश धुमाळ, विभाग प्रमुख आकाश शेलार शाखा प्रमुख सचिन ठाकूर आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Popular posts
लिफ्टमध्ये अडकलेल्या ४ तरुण-तरुणींची अग्निशमन दलाकडून सुटका...
Image
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत पदकांची कमाई ...
Image
महिलेची हत्या करण्यामध्ये आरोपीसोबत सहभागी असलेल्या प्रेमिकेस गुन्ह्यातील गाडीसह घेतले ताब्यात...
Image
भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न..
Image
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोजे येथे भव्य वृक्षारोपण अभियान ; शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Image