शिवसेना - युवासेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या इंधन व गॅस दरवाढी विरोधात जाहीर निषेध आंदोलन...


पनवेल / वार्ताहर :-  शिवसेना, युवासेना पनवेल विधानसभा यांच्यावतीने केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढी विरोधात जाहीर निषेध मोर्चा व आंदोलन करण्यात आले. 

याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड शिरीष घरत या आंदोलनात सहभागी झाले व युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले त्यासाठी पाठिंबा दिला. यावेळी शिवसेना खारघर शहर प्रमुख शंकरशेठ ठाकूर युवासेना रायगड जिल्हा विस्तारक ओंकार चव्हाण, युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, रामचंद्र देवरे, संतोष गुजर, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, युवतीसेनेच्या जिल्हा अधिकारी योगिता पाटील, विभाग अधिकारी मनोज कुंभरकर यांच्या समवेत शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Popular posts
तळोजा येथील 'द एलिट पब्लिक स्कूल' मधील विद्यार्थ्याचे बॉक्सिंग स्पर्धेत सुयश...
Image
पनवेल सीकेपी समाजाच्या कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याची शतकोत्तर वाटचाल ; दोन दिवसीय पारंपारिक कृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात संपन्न
Image
गुन्हे शाखा कक्ष ३ पनवेल वपोनिपदी औदुंबर पाटील तर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी सुभाष पुजारी..
Image
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि MHFDA पनवेलच्या ‘नवदृष्टी’ उपक्रमातून शिक्षकांना सर्वांगीण आरोग्याचे मार्गदर्शन..
Image
खारघर मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार ; गर्भवती महिलेच्या पित्तनलिकेतून काढले १५ मोठे खडे...
Image