दुकानाला लागलेल्या आगी दरम्यान नगरसेवक राजू सोनी यांची तत्परतेने मदत....

पनवेल दि.२३ (वार्ताहर)- शहरातील ममता कॉस्मेटिक्स दुकानाला लागलेल्या आगीच्या वेळी स्थानिक नगरसेवक राजू सोनी यांनी धाव घेऊन तत्परतेने हि आग विझवण्यासाठी मोठी मदत केली आहे.
         पनवेल मधील जुने भाजी मार्केट येथे  नारायण शर्मा यांच्या मालकीचे असलेले ममता कॉस्मेटिक्स यांच्या दुकानाला आज संध्याकाळी 5 -30च्या दरम्यान आग लागली  याची माहिती येथील काही व्यापाऱ्यांनी नगरसेवक राजु सोनी यांना फोन करून दिली ते तत्काळ  तेथे पोहोचले व लगेच अग्निशामक दलाला फोन करून  ताबडतोब बोलवले व त्या ठिकाणी संपुर्ण  महानगरपालिकेची यंत्रणा लावुन   स्वतः उभे राहून संपूर्ण आग विझवण्यात आली त्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी त्यांचे खुप आभार मानले आहेत.
     
Comments