जाणीव सामाजिक संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा दीपोत्सव – आदिवासी बांधवांसोबत लुटला दिवाळीचा आनंद
पनवेल / प्रतिनिधी : -
जाणीव एक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष महापौर नितीन जयराम पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात . याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून खारघर येथील चाफेवाडी व फणसवाडी येथील आदिवासी बांधवांसोबत दिवाळी फराळाचे वाटप करून आनंदात दिवाळी साजरी करण्यात आली.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सणांचा आनंद पोहोचावा, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे आणि आपुलकीच्या नात्यांची वीण अधिक घट्ट व्हावी, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. दिवाळीचा खरा आनंद हा एकमेकांसोबत आनंद वाटून घेण्यातच असतो, याची सुंदर अनुभूती या उपक्रमातून मिळाली.
यावेळी महापौर नितीन जयराम पाटील,पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब’चे सभापती मधुशेठ पाटील, भाजप खारघर शहर मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक प्रवीण पाटील, भाजप पदाधिकारी संजय घरत, पनवेल महानगरपालिका उपायुक्त डॉ. वैभव विधाते, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी तसेच इतर मान्यवर आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.