ओरियन मॉल, पनवेल येथे मुलांसाठी विज्ञान प्रदर्शन....
ओरियन मॉल, पनवेल येथे मुलांसाठी विज्ञान प्रदर्शन....
पनवेल वैभव, दि.15 (संजय कदम) ः नेहरू सायन्स सेंटर यांच्या सहकार्याने ओरियन मॉल, पनवेल येथे 25 मे 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात भेट देण्यासाठी व सहभाग घेण्यासाठी आवाहन ओरियन मॉलच्या वतीने मंगेश परुळेकर व मनन परुळेकर यांनी केले आहे.
हे विशेष प्रदर्शनी विज्ञान शिक्षणामध्ये जिज्ञासा वाढवण्यासाठी आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाचा एक भाग आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी हे प्रदर्शन म्हणजे विज्ञानाच्या मनोरंजक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी सादरीकरणाचा अनुभव घेण्याची एक अनोखी संधी आहे. नेहरू सायन्स सेंटर दीर्घकाळापासून प्रत्यक्ष प्रयोग, संवादात्मक मॉडेल्स आणि कार्यशाळांच्या माध्यमातून विज्ञान व तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत सहज व प्रभावी पद्धतीने पोहोचवत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी थरारक लाइव्ह प्रयोग व सहभागी होण्याची संधी सुद्धा उपलब्ध आहे. तसेच मुलांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी मार्गदर्शक कार्यशाळा आहे. त्याचप्रमाणे विज्ञान समजून घेण्यास मदत करणार्‍या नवकल्पनांचा अनुभव येथे मिळणार आहे. त्यामुळे हा अनुभव विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीला अर्थपूर्ण बनवेल आणि त्यांच्यात विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी दीर्घकालीन रुची निर्माण करेल. तरी उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो ः ओरियन मॉल विज्ञान प्रदर्शन
Comments