तरुणी बेपत्ता
पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः
राहत्या घरातून एक तरुणी कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
निकिता रामदास कातकरी (21 रा.पळस्पे गाव) असे या तरुणीचे नाव असून बांधा मजबूत, चेहरा गोल, डोळे काळे, नाक बसके, उंची 4 फुट असून अंगात चॉकलेटी रंगाचा टॉप व पांढर्या रंगाची लेगिझ परिधान केलेली आहे.
या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा पो.ना.चव्हाण मो.नं.8424032111 येथे संपर्क साधावा.
फोटो ः निकिता कातकरी