शिवजयंती निमित्त शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पनवेलतर्फे शिवरायांना अभिवादन..
पनवेल वैभव, दि.17 (वार्ताहर) ः छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल शहर शाखेतर्फे शिवजयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, शहर प्रमुख प्रविण जाधव, युवासेना जिल्हा प्रमुख पराग मोहिते, अच्युत मनोरे, राकेश टेमघरे, शहर संघटीका अर्चना कुळकर्णी, विभागप्रमुख प्रशांत नरसाळे, विभाग संघटीका अश्विनी देसाई, शाखाप्रमुख संतोष तळेकर, अरुण ठाकूर, मयुरेश दसवते आदी उपस्थित होते.
फोटो ः शिवरायांना अभिवादन