विविध गुन्ह्यातील २५ जप्त वाहनांचा पनवेल शहर पोलीस करणार जाहीर लिलाव...
विविध गुन्ह्यातील २५ जप्त वाहनांचा पनवेल शहर पोलीस करणार जाहीर लिलाव...

पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः पनवेल शहर पोलीस ठाणे येथे विविध गुन्हयांमध्ये एकूण 25 वाहने जप्त करण्यात आलेली असून सदर वाहनांचे मुळ मालकांचा शोध घेतला परंतु ते मिळून येत नाहीत. सदरच्या गाडया बर्‍याच कालावधीपासून पोलीस ठाणे आवारात पडून आहेत. त्यांचे मुळ मालक मिळून येत नसल्याने प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया केली जाणार आहे.
तत्पुर्वी वरील नमुद वाहनांबाबत आजपर्यंत कोणीही सदर वाहनांचे मालकीबाबत दावा दाखल केलेला नाही. मा. प्रादेशिक परिवहन अधिकारी कळंबोली यांचेकडे उपलब्ध वाहनांचे आरटीओ रजि.नंबर, इंजिन नंबर, चेसीज नंबरची पडताळणी केली असता सदर वाहनांचे मालक मिळून आले नाहीत. 
सदर गुन्हयातील जप्त वाहने ही भंगारात क्रश करून त्याचा लिलाव करण्याची मा. न्यायालयाने परवानगी दिली असून सदर वाहनांचा दिनांक 18/02/2025 रोजी 11.00 वा. रोजी पनवेल शहर पोलीस ठाणे आवारात लिलाव करण्यात येणार असून त्यासाठी इच्छुकांनी तत्पुर्वी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे दुरध्वनी क. 8591424350 वर संपर्क साधावा, असे आवाहन वपोनि नितीन ठाकरे यांनी केले आहे.



फोटो ः जप्त वाहने
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image