NMGKS संघटनेच्या दोन नामफलकाचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते अनावरण..

NMGKS संघटनेच्या दोन नामफलकाचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते अनावरण...


पनवेल वैभव / प्रतिनिधी :-     कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेची घोडदौड दिवसेंदिवस सुरु आहे. कामगारांप्रती असणारी आस्था व कामगारांना न्याय मिळवून देण्याचे कौशल्य यामुळे न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटना रायगड व नवीमुंबई मधील कामगारांसाठी आधारस्तंभ बनलेली आहे. अतिरिक्त पाताळगंगा एम.आय.डी.सी.चावणे येथील HPCL व कुंभिवली ता. खालापूर येथील G.A. Steel या दोन कंपन्यातील कामगारांनी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. संघटनेच्या नामफलकाचे अनावरण एकाच दिवशी दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी कामगारांना मार्गदर्शन करतांना महेंद्रशेठ घरत म्हणाले कीस्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादीत करून हे प्रकल्प उभारले आहेत येथे स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे. जर का व्यवस्थापन मुजोरपणा करून स्थानिक तरुणांना वेठीबिगाऱ्या प्रमाणे वागणूक देत असतील तर आम्ही कदापीही सहन करणार नाही जशास तसे उत्तर देणार असे ते यावेळी म्हणाले.

या प्रसंगी,पि. के. रमण - (कार्याध्यक्ष  - न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटना)निखिल डवळे - (युवक जिल्हाध्यक्ष),अशोक मुंडे - (सरचिटणीस - रा. जि. कॉं. क)वसंत काठावळे - (मा. उपसभापती)दिनकर देसाईसिताराम माळीदिलीप टकलेरजनिकांत माळीबाळाराम म्हात्रेसंतोष कोंडीलकरधनाजी कोंडीलकरमोतीराम कोंडीलकरविनायक डवळेकिरण सते,NMGKS संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटीललंकेश ठाकूरआदित्य घरतआनंद ठाकूरअरुण म्हात्रेउत्तम पाटीलचंद्रकांत ठाकूरराजेंद्र भगत तसेच शेकडोंच्या संखेने कामगार उपस्थित होते.

Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image