महाविकास आघाडीची उरण मध्ये प्रचारात आघाडी
"प्रितम म्हात्रेंच्या नेतृत्वात युवाशक्ती मैदानात"
        

पनवेल / वार्ताहर : 
मावळ लोकसभेच्या मतदानाचे दिवस जसे जवळ येत आहे तसा प्रचारामध्ये जोर चढत आहे. मावळ मध्ये फॉर्म भरल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने प्रचारात उतरलेली दिसत आहे. कोणी उंटावर बसून प्रचार करतो, तर कोणी मोटरसायकल रॅली काढून प्रत्येक पक्षाने विविध प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. 
        अशातच आज उरण मध्ये वेगळे चित्र दिसले. महाविकास आघाडीने आज उरण विभागामध्ये  गाव पातळीवर मॅरेथॉन भेटीचे नियोजन करून मतदारांपर्यंत पत्रकाद्वारे श्री संजोग भिकू वाघेरे पाटील यांचा प्रचार केला. यावेळी मा.आमदार श्री बाळाराम पाटील, शिवसेना नेते श्री बबनदादा पाटील, मा.आमदार श्री मनोहर भोईर,कामगार नेते भूषण पाटील, काँग्रेस नेते श्री.महेंद्र शेठ घरत, शेकापचे मा.विरोधी पक्ष नेते श्री.प्रितम म्हात्रे, राष्ट्रवादीचे श्री. प्रशांत पाटील , राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सौ.भावनाताई घाणेकर यांच्यासोबतच महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 
       जासई येथील हुतात्मा स्मारक आणि स्वर्गीय दि. बा. पाटील साहेबांना पुष्पहार घालून अभिवादन करून या दौऱ्याला सुरुवात झाली. यावेळी उपस्थित नागरिक आणि पदाधिकाऱ्यांना उमेदवाराची माहिती आणि उरणच्या विकासा संदर्भातील विविध विषयांवर मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रचारामध्ये तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी बोलताना मा.आमदार श्री बाळाराम पाटील यांनी सांगितले की, सर्वात जास्त मताधिक्य उरण मधून महाविकास आघाडीला मिळवून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता सर्व जोर लावून प्रचारात महाविकास आघाडीतील इतर कार्यकर्त्यां सोबत आघाडीवर असेल. कामगार नेते महेंद्र घरत यांनी सांगितले की महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नियोजनबद्ध प्रचारामुळे पन्नास हजार पेक्षा जास्त मताधिक्य महाविकास आघाडीला उरण मधून मिळेल याची खात्री वाटते. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ही चांगली संधी आली आहे सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने प्रचार करून गद्दाराचा पराभव करूया असे आवाहन मा.आमदार श्री मनोहर भोईर यांनी केले.

कोट
महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील विधानसभेची आकडेवारी पाहता नियोजनबद्ध प्रचाराची आखणी करून तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन महाविकास आघाडीने केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवून मावळ मतदार संघातील सर्वात जास्त मताधिक्य आम्ही उरणमध्ये केलेल्या विकासकामांच्या जोरावर  श्री संजोग भिकू वाघेरे  पाटील यांना उरण विधानसभा मतदार संघातून मिळवून देणार

श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे
मा.विरोधी पक्षनेते 
(पनवेल महानगरपालिका)
(खजिनदार,शे.का.प. रायगड)
Comments