लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल शहर पोलिसांचे संवेदनशिल परिसरात रुट मार्च..
शहर पोलिसांचे संवेदनशिल परिसरात रुट मार्च

पनवेल, दि.31 (संजय कदम) ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल शहर पोलिसांनी पनवेल शहर ते करंजाडे पोलीस चौकी असा रुट मार्च काढून पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे दर्शन त्यांनी यावेळी घडविले.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 आरपीएफ कंपनीचे एक अधिकारी, 32 अंमलदार यांच्च्यासह पोलीस ठाणे कडील 2 पोनि, 6 सपोनि/पोउपनि व 42 अंमलदार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाची मतदान केंद्रे, संवेदनशील परीसर, संमिश्र वस्ती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची ठिकाणे म्हणजेच पनवेल मनपा येथून सुरू मुसलमान मोहल्ला, मिरची गल्ली नाका, टपाल नाका, उरण नाका, मच्छी मार्केट, वडघर, करंजाडे से. 1, 2, 3, 4 आणि सेक्टर 5 करंजाडे चौकी येथे समाप्त करण्यात आली.
या रुट मार्चमध्ये 06 वाहनांसह पायी भेटी देवुन त्यांना परीसर व परीस्थितीची माहिती देण्यात आली.



फोटो ः पोलिसांचा रुट मार्च
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image