मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा खासदर श्रीरंग अप्पा बारणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनेकांचा शिवसेनेत प्रवेश...
वाढदिवस निमित्त अनेकांचा शिवसेनेत प्रवेश...

पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा मावळ लोक सभा खासदर व संसदरत्न श्रीरंग अप्पा बारणे ह्यांचा वाढदिवस चला हवा देऊया हा सुप्रसिद्ध हास्य कार्यक्रमाच्या माध्यमातून कळंबोली येथिल छत्रपती शिवाजी क्रीडा मैदानात मोठया जलोष्यात साजरा केला गेला. हा कार्यक्रम बघायला नागरिकांची मोठया प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी अनेकांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेवून जाहीर प्रवेश केला.
याच कार्यक्रमामध्ये, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व आणि कार्यपद्धती तथा राजकारण, कौशल्यशी प्रभावित होऊन विविध इतर पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. 
यावेळी खासदार श्रीरंग अप्पा बारणे, पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, पनवेल महानगर संघटक मंगेश रानावडे व पनवेल विधानसभा परिसरातील सर्व शहर प्रमुख यांनी सर्व प्रवेश करणार्‍या महिलांचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यामध्ये प्रामुख्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपमहानगरप्रमुख रिना पाटील, माजी शहरप्रमुख पारुल सुर्यवंशी यांच्यासह सौ पार्वती पाटील,  सौ लीला पवार , सौ कोमल पाटील या उद्धव बाळासाहेब गटाच्या महिला पदाधिकारी  तसेच मयूर पाटील, मन पटेल, इथेषयाम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या -युवासेना पदाधिकारी ), मनसे खारघर महिला शहराध्यक्षा सौ चंचला बनकर, सौ आंजनी सरांफ, सौ भावना भिऊनगडे, सौ पद्मा सरांफ, सौ शितल भिऊनगडे, सौ वैशाली पंडित, सौ तारा आदींनी पक्ष प्रवेश केला आहे.फोटो ः पक्षप्रवेश
Comments