लायन्स पनवेल सरगम तर्फे विद्यार्थ्यांसाठी कराओके स्पर्धेचे आयोजन...
लायन्स पनवेल सरगम तर्फे विद्यार्थ्यांसाठी कराओके स्पर्धा...


पनवेल दि.२८(संजय कदम): लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे पनवेल महानगर पालिका हद्दीतील शालेय विद्यार्थ्यांसाठी कराओके गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सदर स्पर्धा इ 5 वी ते 7वी आणि इ 8 वी ते 10वी अशा 2 गटात होणार आहेत. स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता बांठीया हायस्कूल सभागृह येथे संपन्न होणार असून अंतिम फेरी रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी घेण्यात येईल.
            स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकाने 1 हिंदी किंवा मराठी गाणे 4 मिनिटात सादर करायचे आहे. आपल्या गाण्याचा ट्रॅक मोबाईल किंवा पेन ड्राईव्ह मधे आणायचा आहे. इच्छुक स्पर्धकाने नाव नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी मोबाईल क्र. 9819654419 किंवा 9820974715 या क्रमांकावर संपर्क करावयाचा आहे. प्रवेश फी रु. 150/- असून प्रत्येक गटामधून 3 क्रमांक आणि 2 उत्तेजनार्थ पारितोषिके (रोख बक्षीस आणि स्मृतिचिन्ह) देण्यात येतील. प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे आवाहन लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे करण्यात आले आहे.
Comments
Popular posts
तळोजा येथील 'द एलिट पब्लिक स्कूल' मधील विद्यार्थ्याचे बॉक्सिंग स्पर्धेत सुयश...
Image
गणेशोत्सवात वाहतुकीचे नियोजन ; अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर...
Image
पनवेल सीकेपी समाजाच्या कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याची शतकोत्तर वाटचाल ; दोन दिवसीय पारंपारिक कृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात संपन्न
Image
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि MHFDA पनवेलच्या ‘नवदृष्टी’ उपक्रमातून शिक्षकांना सर्वांगीण आरोग्याचे मार्गदर्शन..
Image
खारघर मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार ; गर्भवती महिलेच्या पित्तनलिकेतून काढले १५ मोठे खडे...
Image