मोटारसायकल चोर गजाआड...
मोटारसायकल चोर गजाआड...
पनवेल / दि.२३ (संजय कदम) : पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत २ गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून चोरलेल्या तीन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
  गेल्या काही दिवसांपासून पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात मोटार सायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिंदे व पोलीस निरीक्षक जोशी यांनी या चोरांना पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे दोन पथके तयार केले. त्यामध्ये सहाय्य्क पोलीस निरीक्षक दळवी, पो.उप.नि अभयसिंह शिंदे, पोहवा. वाघमारे, पोना.राठोड, पोशि. दुधे, मिसाळ, पोना. पाटील, पोहवा रविंद्र राऊत, पोना परेश म्हात्रे, पोना महेंद्र वायकर, पोना विनोद देशमुख, पोना रविंद्र पारधी, पोशि विवेक पारासुर, पोशि प्रसाद घरत आदींनी या चोरट्यांचा शोध घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे सादर आरोपी नामे वेदांत संदिप अंबावणे (वय 22 वर्षे, रा. रूम नं. 201, प्रेरणा को.हो.सो., सुकापुर) व अज्ञान अंकुश राठोड (वय 23वर्षे, रा. ठि. हनुमान मंदिराजवळ, सूकापुर) यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन विविध गुन्ह्यातील तीन दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.
Comments
Popular posts
तळोजा येथील 'द एलिट पब्लिक स्कूल' मधील विद्यार्थ्याचे बॉक्सिंग स्पर्धेत सुयश...
Image
गणेशोत्सवात वाहतुकीचे नियोजन ; अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर...
Image
पनवेल सीकेपी समाजाच्या कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याची शतकोत्तर वाटचाल ; दोन दिवसीय पारंपारिक कृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात संपन्न
Image
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि MHFDA पनवेलच्या ‘नवदृष्टी’ उपक्रमातून शिक्षकांना सर्वांगीण आरोग्याचे मार्गदर्शन..
Image
खारघर मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार ; गर्भवती महिलेच्या पित्तनलिकेतून काढले १५ मोठे खडे...
Image