पात्र फेरीवाल्यांची यादीप्रसिद्ध ; हरकती व सूचना मांडण्यासाठी २५ ऑक्टोबर अंतिम मुदत...
 २५ ऑक्टोबर अंतिम मुदत


पनवेल दि.१० (वार्ताहर) : पालिका अंतर्गत फेरीवाल्यांना सहाय्य या घटकाचे काम पाहिले जाते. या घटकांतर्गत करण्यात सर्वेक्षणात आलेल्या फेरीवाला पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांची यादी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून यावर हरकती व सूचना मांडण्यासाठी पालिकेकडून २५ ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे.
पनवेल पालिका क्षेत्रातील विविध भागात मोठ्या प्रमाणात फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याची जवाबदारी पालिका प्रशासनावर येऊन पडली आहे. फेरीवाल्यांची ही समस्या सोडवण्यासाठी व सिडकोने फेरीवाल्यांकरिता राखीव ठेवलेल्या भूखंडावर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेच्या वतीने फेरीवाला समिती स्थापन करण्यात आली असून, पालिका हद्दीतील फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. या सर्वेक्षणाने आखून दिलेल्या निकषावर पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांची यादी पालिकेच्या संकेतस्थळावर २३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली आहे. पालिकेने या यादीवर हरकती आणि सूचना मांडण्यासाठी २५ ऑक्टोबर पर्यंत कालावधी देण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. जवळपास ५५ भूखंडांचे हस्तांतरण पालिकेकडे झाले आहे तर काही भूखंडांचे हस्तांतरण पालिकेकडे होणे बाकी आहे. पालिकेकडे हस्तांतरित झालेल्या भूखंडावर फेरीवाला धोरणा नुसार पात्र फेरीवल्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.
Comments
Popular posts
तळोजा येथील 'द एलिट पब्लिक स्कूल' मधील विद्यार्थ्याचे बॉक्सिंग स्पर्धेत सुयश...
Image
पनवेल सीकेपी समाजाच्या कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याची शतकोत्तर वाटचाल ; दोन दिवसीय पारंपारिक कृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात संपन्न
Image
गणेशोत्सवात वाहतुकीचे नियोजन ; अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर...
Image
खारघर मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार ; गर्भवती महिलेच्या पित्तनलिकेतून काढले १५ मोठे खडे...
Image
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि MHFDA पनवेलच्या ‘नवदृष्टी’ उपक्रमातून शिक्षकांना सर्वांगीण आरोग्याचे मार्गदर्शन..
Image