तरूणाचा बुडून मृत्यू..
तरूणाचा बुडून मृत्यू
पनवेल दि.08 (वार्ताहर): गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना पनवेल शहरातील कोळीवाडा परिसरात घडली आहे.
          राम अनंता शेलार (वय-22) हा रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गणपती विसर्जनासाठी खाडीत गेला असता त्याचा तेथे बुडून मृत्यु झाला आहे. आज सकाळी त्याचा मृतदेह खाडीत सापडला. सदर मुलगा हा एकुलता एक होता. त्याच्या दुर्दैवी मृत्युमुळे कोळीवाडा परिसरात शोककळा पसरली आहे.
Comments