वडाळे तलावा संदर्भात केलेल्या सूचनांचा प्रितम म्हात्रे यांनी घेतला आढावा...
"सायंकाळच्या वेळेस नागरिकांशी साधला संवाद"
पनवेल / प्रतिनिधी : - काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी वडाळे तलाव येथील सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला होता. त्यावेळी तेथे सुरू असलेल्या कामातील निकृष्ट दर्जा बद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि त्या दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या होत्या त्या केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी आज विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे ,नगरसेविका प्रीती जॉर्ज यांनी भेट दिली.
यावेळी पनवेल महानगरपालिकेचे अभियंता संजय कटेकर आणि श्री गावडे उपस्थित होते.
यावेळी तिथे सफाई नसल्यामुळे सदर ठिकाणी दिवसातून दोन वेळा स्वच्छता करण्यात यावी असे सांगितले. काही ठिकाणी ट्रॅकवर साचलेले पाणी निघण्यासाठी पाण्याचे पाईप जमिनीपासून दोन इंच वर आहेत ही गोष्ट अभियंता यांच्या निदर्शनास आणली. सदर ठिकाणी नागरिकांचा वावर सुरू झाल्यामुळे त्या ठिकाणी लवकरात लवकर कचरा कुंडी बसवण्यात यावी असे सुचविले.
बऱ्याच ठिकाणी भरलेल्या सांध्यांना क्रॅक आलेले आहे. काही दिवसांनी ते उन्हाच्या तडाख्याने निघणार त्यामुळे ते योग्य रीतीने भरण्यात यावे याची दक्षता घेण्यास सांगितले. तलावाच्या सभोवताली ट्रॅकवर सीसीटीव्ही ची आवश्यकता आहे ते लवकरात लवकर बसवण्यात यावे.
चालण्याच्या ट्रॅकवर कुत्रे आणि सायकली तसेच वाढदिवस साजरे करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे त्यांना कुठेतरी आळा घालण्यात यावा अशी मागणी तेथे उपस्थित असणारे ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांकडून करण्यात आली. त्यासंदर्भात प्रीतम म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेने ठीकठिकाणी नियमावलीचे सूचना फलक लावावे ज्यामध्ये ट्रॅकवर सायकलने आणू नये, कुत्रे आणू नये ,वाढदिवस साजरे करू नये ,फटाके फोडू नये
अशा प्रकारच्या ठराविक सूचना असतील .
तसेच सदर विभागातील स्वच्छता अधिकारी आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांचा संपर्क क्रमांक असावा जेणेकरून नागरिकांना तक्रार करण्यास सहकार्य होईल असे संबंधित अधिकाऱ्यांना सुचवले आणि येत्या काही दिवसात बोर्ड लावण्यात यावे असे सांगितले.
त्या ठिकाणी पोलीस आणि सुरक्षारक्षकांसाठी उंचीवर असलेल्या मचान स्वरूपी पेट्रोलिंग केबिन असावी जेणेकरून त्या ठिकाणी उभे राहून संपूर्ण तलाव परिसर पाहता येईल. तलावाच्या संपूर्ण परिसरात तिथे 24 तास सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे जेणेकरून काही रात्रीच्या वेळेस चुकीचा घटना घडतात त्या घडणार नाहीत.
चालण्याच्या ट्रॅक वर काम नवीन असतानाच बऱ्याच ठिकाणी तडे गेलेत. कॉन्ट्रॅक्टरने ते वरच्यावर सिमेंट टाकून भरलेले आहेत कॉलिटी मेंटेन न केल्यामुळे पुढील वर्षी सुद्धा आहेच होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे ते पहिले करून घ्यावे असे त्यांनी सांगितले.
तेथे येणाऱ्या नागरिकांसाठी सबंध परिसरात कुठेही निवारा शेड नाही नागरिकांना बसण्यासाठी ठीक-ठिकाणी हँगिंग प्रकारच्या शेड्स असाव्यात जेणेकरून चालताना नागरिकांना त्याचा अडथळा होणार नाही असे सुचविले.
यावेळी त्यांच्यासोबत पालिका अधिकारी संजय कटेकर, सुधीर साळुंके, श्री.गावडे, मा.नगरसेवक डी.पी.म्हात्रे, शेकाप नेते गणेश म्हात्रे, जॉनी जॉर्ज, माझे सहकारी नरेश मुंढे, मंगेश भोईर, मंगेश अपराज, सुरज बहाडकर, सुजित गुळवे, दर्शन कर्डीले, रोहित मोरे, प्रशांत मोरे, रोहन गावंड, संदेश मोहन, वैभव जोशी यावेळी उपस्थित होते.