पोलीस असल्याची बतावणी करून केली फसवणूक....
पोलीस असल्याची बतावणी करून केली फसवणूक.....

पनवेल, / दि. १९  (संजय कदम) ः पोलीस असल्याची बतावणी करून एका दुकानदाराकडून मंगळसूत्र व रोख रक्कम लंपास केल्याची घटना करंजाडे येथे घडली आहे.
करंजाडे येथे दुकान असलेले कमलेश पंडित (56) यांच्याकडे फॅशन प्रो मोटार सायकलवरुन एक इसम आला व त्याने स्वतः पोलीस असल्याचे सांगून तुम्ही विमल गुटखा विकता त्यामुळे तुमच्यावर केस होईल अशी त्यांना भिती दाखवून त्यानंतर बाजूलाच मोठी चोरी झाली असून चोरीस गेलेला माल हा तुम्ही लपवून ठेवला आहे असे खोटे सांगून त्यानंतर पंडित यांच्या घरी जावून त्यांच्या ताब्यात असलेले 10 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व रोख रक्कम असा मिळून 30 हजार रुपये किंमतीचा ऐवज लबाडीने फसवणूक करण्याच्या इराद्याने काढून घेवून तो पसार झाल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
तळोजा येथील 'द एलिट पब्लिक स्कूल' मधील विद्यार्थ्याचे बॉक्सिंग स्पर्धेत सुयश...
Image
पनवेल सीकेपी समाजाच्या कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याची शतकोत्तर वाटचाल ; दोन दिवसीय पारंपारिक कृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात संपन्न
Image
गुन्हे शाखा कक्ष ३ पनवेल वपोनिपदी औदुंबर पाटील तर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी सुभाष पुजारी..
Image
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि MHFDA पनवेलच्या ‘नवदृष्टी’ उपक्रमातून शिक्षकांना सर्वांगीण आरोग्याचे मार्गदर्शन..
Image
खारघर मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार ; गर्भवती महिलेच्या पित्तनलिकेतून काढले १५ मोठे खडे...
Image