महानगरपालिका क्षेत्रात ड्राईव्ह ईन लसीकरण केंद्र सुरु करावे - सभागृहनेते परेश ठाकूर
पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ड्राईव्ह ईन कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावे, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.   
     
मुंबई व नवी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातही ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करावे, अशा मागणीचे पत्र भाजप सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांना दिले होते. या पत्राच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यासंदर्भात सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांना निवेदन देऊन मागणी केली आहे  
     
 त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही आठवड्यापासून लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. परिणामी महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव हा काहीसा कमी होताना दिसत आहे, परंतु जसे व्यवहार सुरु होतील आणि अनलॉक होत जाईल तसे पुन्हा कोरोनाचे संकट बळावण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटे बाबतदेखील सूचना पहायला मिळत आहे.  कोरोना सोबत जगणे हे आपल्याला शिकावेच लागणार आहे आणि त्याकरीता आपल्या क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाने कोविड प्रतिबंधात्मक लस घेणे गरजेचे आहे.  महानगरपालिकेची लोकसंख्या बघता, होणारे लसीकरण व सध्या कार्यरत असलेले केंद्र हे अपुरे आहेत असे लक्षात येते. आपण लसींचा पुरवठा वाढवावा, तसेच लसीकरण केंद्रही वाढविणे आवश्यक आहे.  खारघर येथील लिटिल वर्ल्डस मॉल अथवा सेंट्रल पार्क चा परिसर आणि पनवेल येथील ओरियन मॉल अथवा वडाळे तलावाच्या परिसरात हे लसीकरण केंद्र सुरू करता येऊ शकते. लसीकरणाची प्रक्रिया ही जितकी सोपी आणि सुटसुटीत राहील तितका त्याला प्रतिसाद जास्त मिळेल. ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र हे त्या दृष्टीने एक पाऊल असणार आहे, त्यामुळे मुंबई व नवी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करावे जेणेकरून ज्येष्ठ व दिव्यांगांना याचा फायदा होईल, तसेच हा उपक्रम सुरु केल्यास असे नागरिक जे कोरोनाच्या भीतीने लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी घाबरत आहेत ते देखील लसीकरण करायला पुढे सरसावतील, असेही सभागृहनेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात अधोरेखित केले आहे.  

Comments
Popular posts
तळोजा येथील 'द एलिट पब्लिक स्कूल' मधील विद्यार्थ्याचे बॉक्सिंग स्पर्धेत सुयश...
Image
पनवेल सीकेपी समाजाच्या कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याची शतकोत्तर वाटचाल ; दोन दिवसीय पारंपारिक कृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात संपन्न
Image
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि MHFDA पनवेलच्या ‘नवदृष्टी’ उपक्रमातून शिक्षकांना सर्वांगीण आरोग्याचे मार्गदर्शन..
Image
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल शहर शाखेत मानवंदना..
Image
खारघर मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार ; गर्भवती महिलेच्या पित्तनलिकेतून काढले १५ मोठे खडे...
Image