नवी मुंबई महापालिकेने नोडल ऑफिसर किंवा पालिकेच्या नियुक्तीने वैद्यकिय तज्ञ नेमण्याची मागणी
पनवेल दि.०९ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिकेने नोडल ऑफिसर किंवा पालिकेच्या नियुक्तीने वैद्यकिय तज्ञ नेमण्याची मागणी भारतीय जनता पक्ष कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय पवार यांच्याकडून नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे करण्यात आली आहे.             

नवी मुंबई महापालिकेने वाढत जाणाऱ्या कोविड रुग्ण संख्येसाठी नवी मुंबई मधील काही छोट्या हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्या होत्या व अश्या तऱ्हेचे हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कार्यरत आहेत व अत्यावश्यक वेळेमध्ये हे हॉस्पिटल जनतेच्या उपयोगी पडत आहेत. पालिकेने आपत्कालीन स्थितीत नव्याने परवानगी दिलेल्या काही रुग्णालयात उपचाराच्या दर्जाबाबत माहिती पालिकेकडे असावी कारण अनेक लहान रुग्णालयात मृत्यू घडत असल्याचे आढळून येत आहे. त्याकरिता पालिकेने त्या ठिकाणी नोडल ऑफिसर नेमावेत किंवा त्या ठिकाणी पालिकेच्या नियुक्तीने वैद्यकिय तज्ञ ची नेमणूक करण्यात यावी त्यामुळे नवी मुंबईमध्ये दिवसोदिवस नवीन रुग्ण संख्याची घट होत आहे त्याप्रमाणे होणाऱ्या मृत्यूची कारणे देखील जनतेच्या समोर येतील अश्या तऱ्हेची मागणी भारतीय जनता पक्ष कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय पवार यांच्याकडून नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे करण्यात आली आहे.         


फोटोः संजय पवार
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image