लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त अबोली महिला रिक्षाचालक संघटनेच्या महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल / प्रतिनिधी : 
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन सुरु आहे. अशामध्ये सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढच होताना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे असलेली उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत.  यामध्ये महिला रिक्षाचालकांवरही मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. याबाबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याचे आवाहन केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही तातडीने जीवनावश्यक वस्तूंचे कीट या संघटनेच्या महिलांकरीता उपलब्ध करुन दिले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसा निमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल तर्फे सर्व रिक्षा अबोली चालक महिलांना राजीव गांधीं मैदानात धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अबोली रिक्षा महिला चालक संघटना, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सर्व महिलांना धान्य देण्यात आले. त्यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत उपस्थितत होते  तसेच  पनवेल, कळंबोली, कामोठे, कल्याण व डोंबिवलीच्या रिक्षा चालक महिलांना जीवनाशक वास्तूंचे वाटप करण्यात आले. ही मदत मिळाल्याबद्दल अबोली महिला रिक्षा चालक संघटनेतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानण्यात आले.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....
Image