राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत पनवेलच्या स्वस्तिका घोषने जिंकला राष्ट्रीय विजेतेपदाचा किताब ...
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून स्वस्तिकाचे कौतुक 
  
पनवेल (प्रतिनिधी)  टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया आणि मध्यप्रदेश टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यप्रदेशमध्ये पार पडलेल्या '८२ व्या ज्युनिअर अँड युथ नॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२०'  या राष्ट्रीय स्पर्धेत पनवेलच्या स्वस्तिका घोषने अंडर १८ मुलींच्या गटात विजेतेपद जिंकले असून त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिका घोषचे अभिनंदन करून कौतुक केले. यावेळी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या प्राचार्या राज अलोनी, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे, स्वस्तिकाचे पालक व प्रशिक्षक संदीप घोष आदी उपस्थित होते. 
मध्यप्रदेश मधील अभय प्रशाल इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेतील अंतिम सामन्यात पनवेलच्या स्वस्तिकाने सुहाना सैनीविरुद्ध जादा गुणांवर गेलेला दुसरा गेम गमावला होता, पण त्यानंतर स्वस्तिकाने प्रतिकार करीत ७-११, ११-१३, ११-७, ११-४, ११-६, ११-९ अशी बाजी मारली. प्रथमच कुमारी गटात खेळलेल्या स्वस्तिकाने दोन गेम गमावल्यानंतरही  दोन्ही कोपऱ्यातून निर्णायक आक्रमण केले. तिची प्रतिस्पर्धी म्हणून खेळलेल्या सुहाना सैनी हि नेटच्या जवळ सर्व्हिस करण्यात माहीर असल्याने तिच्या विरोधात खेळताना साहजिकच दडपण होते, खेळताना स्वस्तिका पिछाडीवर गेली मात्र तिने हार पत्करली नव्हती, त्यामुळेच तिने वेगाने पुढे झुकत सुहानाची सर्व्हिस परतवून लावत तिचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. 
   
खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलची ती इयत्ता बारावीची विद्यार्थीनी असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाला फ्रान्स येथे प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत, तसेच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सरावासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.  स्वस्तिकाने देशात व परदेशात झालेल्या टेबलटेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी करीत देशाचे नाव उंचाविले आहे. हॉंगकॉंग, स्पेन, जॉर्डन, कोलंबो, यांसह इतर देशामध्ये झालेल्या स्पर्धेत स्वस्तिकाने अजिंक्यपद पटकाविले आहे.  स्वस्तिकाने लहानपणापासून टेबलटेनिस खेळात आपली आवड व नैपुण्य दाखविले आहे.  त्यामुळे तीला 'विराट कोहली फाऊंडेशन' कडून स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे. ती भारतातील एकमेव टेबल टेनिस खेळाडू आहे, जी या संस्थेद्वारे स्कॉलरशिपसाठी निवडली गेली आहे.  स्वास्तिकाचे वडील संदीप घोष हे या खेळातील प्रशिक्षक आणि सल्लागार आहेत. ओमान येथे झालेल्या 'ओमान ओपन' स्पर्धेत भारतीय कर्णधार म्हणून यशस्वी जबाबदारीही स्वस्तिकाने पार पडली, त्यावेळी या स्पर्धेत तीने कांस्य पदक मिळविले आणि पदक मिळविणारी भारताची एकमेव खेळाडू ठरली. स्वस्तिकाने २०१३ मध्ये गुजरातमध्ये राष्ट्रीय रँकिंग सेंट्रल झोन टेबल टेनिस चॅम्पियनशिप जिंकली आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. प्रत्येक वर्षी तिने आपल्या खेळातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती दाखविली आहे.  दोन वर्षांपूर्वी पुणे येथे राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या स्पर्धेतही स्वस्तिकाने सुवर्णयश कामगिरी केली. केंद्र शासनाच्या विविध क्रीडा प्रकार असलेल्या 'खेलो इंडिया युथ गेम' या स्पर्धेतही तिने नेत्रदिपक कामगिरी केली होती. त्याचप्रमाणे  '८२ व्या ज्युनिअर अँड युथ नॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२०' राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपदाचा 'किताब जिंकून स्वस्तिका घोषने अंडर १८ मुली गटात टेबल टेनिस श्रेणीतील ऑल इंडिया रँक ०१ तर जागतिक रॅकमध्ये पाचव्या क्रमांक कायम राखले आहे. 

कोट- 
लोकनेते रामशेठ ठाकूर, तसेच विद्यालयाने व प्राचार्या राज अलोनी यांनी स्वस्तिकाच्या प्रगतीसाठी नेहमीच मदतीचा हात दिला आहे. वेळोवेळी मार्गदर्शन करून तिला प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्याकडून होत असलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. टेबल टेनिस मध्ये स्वस्तिकाने राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अनेक बक्षिसे मिळविली, पण या स्पर्धेत जिंकलेले राष्ट्रीय चॅम्पियनशिप बहुमोल असून हे पारितोषिक लोकनेते रामशेठ ठाकूर, विद्यालयाला समर्पित करतो.      
- संदिप घोष- स्वस्तिकाचे पालक व प्रशिक्षक
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image