लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसनिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम; बुधवारी नियोजन बैठक

पनवेल(प्रतिनिधी) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे  यंदाही विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्या संदर्भातील नियोजन आढावा बैठक बुधवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. 
  
सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि सगळा समाज आपला कुटुंब आहे, असे मानून नेहमी मदतीचा हात देणारे दानशूर व्यक्तीमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा ७० वा वाढदिवस आहे. नेहमीप्रमाणे वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जातो यंदाही सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून पण त्यांच्या कार्याला साजेसा असा भव्य स्वरूपात आणि संस्मरणीय वाढदिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात सायंकाळी ०४ वाजता भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक होणार असून या बैठकीस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले आहे. 

Comments