ऑन्कोकेअर (MOC) सेंटरच्या पनवेलमधील शाखेचे अभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड यांच्या हस्ते उदघाटन..
ऑन्कोकेअर (MOC) सेंटरच्या पनवेलमधील शाखेचे अभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड यांच्या हस्ते उदघाटन..

पनवेल / प्रतिनिधी :-  कर्करोगावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अद्ययावत उपचार करणाऱ्या मुंबई ऑन्कोकेअर सेंटरच्या पनवेल मधील शाखेचे उदघाटन रविवार दि. १७ एप्रिल रोजी सकाळी सुप्रसिध्द अभिनेत्री सामाजिक उद्योजिका आणि निर्माती डॉ निशिगंधा वाड व  टाटा मेमोरियल हॉस्पिटल (ACTREC) नवी मुंबईचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, यांच्या हस्ते करण्यात आले.  

 सेंटरचे डॉ.देवेंद्र पाल आणि डॉ.प्रितम कळसकर, डॉ गुणे तसेच डॉक्टर अधिकारी कर्मचारी तसेच पनवेलच्या उपमहापौर सीताताई पाटील व  माजी नगराध्यक्ष गणेश पाटील यावेळी उपस्थित होते.

मुंबई ऑन्कोकेअर सेंटर ही कर्करोगांवर अद्ययावत उपचार करणारी डे-केअर साखळीस्वरुप संस्था आहे. मुंबई व महाराष्ट्रात ८ सेंटर्स सध्या कार्यरत असून गेली ४ वर्ष कर्करोगग्रस्तांना उच्चशिक्षित कर्करोगतज्ञांमार्फत, सर्व आधूनिक सुविधांनी सज्ज अशा डे केअर सेंटर्समधे, वाजवी दरात उपचार उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पनवेलच्या आजूबाजूला अनेक कॅन्सर पेशंट वाढत असून त्यांना नवी मुंबई तसेच मंबई मध्ये उपचार करण्यात करता जावे लागते, त्यामुळे मोठे खर्च होत असून वेळ वाया जात असल्याने पनवेल खांदा वसाहत मध्ये हे केंद्र उभारण्यात आले आहे. भविष्यात सरकारी योजना सुरु करण्याचा मानस आहे असे केंद्रच्या वतीने सांगितले, पनवेल मध्ये वाढत चाललेली लोकसंख्या आजूबाजूला वाढत असलेली शहरे या करता पनवेल मध्ये पालिकेचे स्वःत रुग्णालय असणे भविष्यात गरजेचे असल्याचे डॉ गुणे यांनी मार्गदर्शनात सांगितले.

मुंबई ऑन्कोकेअर येथे सध्या १५ उच्चशिक्षित मेडीकल ऑन्कोलॉजिस्ट, ३० केमोथेरपी प्रशिक्षित परिचारीका व जवळपास २०० इतका प्रशासकिय कर्मचारी वर्ग असून, ८ डे केअर सेंटर्स रुग्ण सेवेत कार्यरत आहेत. गेल्या ४ वर्षाच्या कालावधीत मुंबई ऑन्कोकेअरने दरवर्षी १५,००० केमोथेरपी या हिशोबाने ६०,००० हून अधिक केमोथेरपी दिलेल्या आहेत. एकंदर १,००,००० पेक्षा अधिक रुग्णांना समाधानकारक समुपदेशन व उपचार दिलेले आहेत. रुग्णांच्या समीप, उच्चशिक्षित कर्करोगतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उच्चश्रेणी व सुरक्षित पायाभूत सुविधांसह, वाजवी दरात उपचार उपलब्ध करून देण्याची खात्री डॉ.पाल व डॉ.कळसकर यांनी मुंबई ऑन्कोकेअरच्या वतीने दिली.

Comments