पनवेलमध्ये शिवसेनेकडून प्रभाग क्र १४ येथे दावत -ए -इफ्तारचे आयोजन ...
पनवेलमध्ये शिवसेनेकडून प्रभाग क्र १४ येथे दावत -ए -इफ्तारचे आयोजन ...


पनवेल/ प्रतिनिधी : - दि. २० एप्रिल २०२२ रोजी शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक १४ प्रेस्टिज गार्डन सोसायटी, येथे दावत-ए-इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेनेचे पनवेल उपशहर प्रमुख अबरार मास्टर- कच्छी , प्रभाग क्रमांक १४ चे उपविभाग संघटक जुनैद पवार, शाखाप्रमुख नुरूल्ला वाईकर ,यांच्या पुढाकाराने या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खास पाहुणे, मौलाना शाह अब्दुल गणी व शिवसेना जिल्हा अध्यक्ष शिरीष घरत  , पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, पनवेल महानगर संघटक ऍड प्रथमेश सोमण, विधानसभा संघटक दीपक निकम, तालुका संघटक भरत पाटील ,जमील खान , शेख इम्तियाज भाई, शहरप्रमुख प्रवीण जाधव , यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
Comments