तीन वर्षीय मुलासह आई बेपत्ता ..
तीन वर्षीय मुलासह आई बेपत्ता ...

पनवेल दि. १२ ( संजय कदम ) : पनवेल जवळील पळस्पे गाव येथे राहणारी एक विवाहित महिला आपल्या तीन वर्षीय मुलासह राहत्या घरातून कुठेतरी निघून गेल्याने ते दोघे हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे . 
                      
संगीता  गोरख हिप्परकर ( वय २२)  , उंची ५ फूट २ इंच, अंगाने सडपातळ, गोरा वर्ण ,केस काळे व लांब , नाक सरळ असून अंगात निळ्या रंगाची साडी आहे तिला मराठी भाषा 
अवगत आहे . सोबत तीन वर्षीय मुलगा प्रतीक , रंग गोरा अंगाने मध्यम असून अंगात निळा रंगाचा ड्रेस घातला आहे . या दोघाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन - ०२२-२७४५२३३३ किंवा पोहवा . सुरेश थोरात यांच्याशी संपर्क साधावा . 

फोटो - संगीता  गोरख हिप्परकर व प्रतीक
Comments