''अपरिचित रामायण'' या विषयावरील ॲड. विक्रम एडके यांची व्याख्यानमाला संपन्न..
''अपरिचित रामायण'' या विषयावरील ॲड. विक्रम एडके यांची व्याख्यानमाला संपन्न 
पनवेल / दि.१२ (वार्ताहर)   : पनवेल मधील पुरातन श्रीबल्लाळेश्वर व श्री रामजी देवस्थान यांचे अध्यक्ष राजेंद्र बापट व ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण तसेच 'आमचे आम्हीच मित्र मंडळ ' यांच्या संयुक्त विद्यमाने रामनवमीच्या उत्सवात यावर्षी ॲड. विक्रम एडके यांचे ''अपरिचित रामायण'' या विषयावर तीन दिवसीय व्याख्यान संपन्न झाले याला पनवेलकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला .  
                                 
नेहमीच्या त्याच - त्या घटनांपेक्षा काही अपरिचित असे रामायणातील प्रसंग व रामायणा बाबत विविध गैरसमज या सर्वांचे खंडन आपल्या व्याख्यानातून उत्तम रित्या करत अतिशय सुंदर असे सादरीकरण विक्रम एडके यांनी केले. विशेष बाब म्हणजे रात्रीची ९.३० ची वेळ, लोकांची सोशल मीडियावर वाढलेली व्यग्रता, आणि आय.पी.एल.... कार्यक्रम ही व्याख्यानाचा, तेही अशा क्लिष्ट विषयासंदर्भात, तरी पण पनवेलमधील श्रोत्यांनी व्याख्यानाचे तीनही दिवस ''हाउसफुल्ल'' प्रतिसाद देत प्रचंड गर्दीत या व्याख्यानाचे श्रवण केले. अठरा ते वीस वर्षे वयोगटातील एक मोठा ग्रुप तीनही दिवस अगदी वेळेत या व्याख्यानासाठी येत होता. 
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल कांबरे, अनिलकुमार कुळकर्णी, किरण गोखले व 'आमचे आम्हीच' चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली . 


Comments