अपघातग्रस्त मोटरसायकलची चोरी...
अपघातग्रस्त मोटरसायकलची चोरी..

पनवेल / दि.२६ (संजय कदम) : एका अपघातग्रस्त मोटरसायकलची चोरी अद्यात चोरट्याने केल्याची घटना पनवेल जवळील पाडेघर येथे जे.डबल्यु.आर. कंपनीसमोर घडली आहे.

किशोर पाटील वय ३५ यांचा अपघात होऊन त्यात ते जखमी झाल्याने उपचारासाठी ते त्यांची मोटरसायकल तेथेच ठेवून गेले असता काहीवेळाने उपचार घेऊन परत त्या जागेवर आले असता सदर ठिकाणी त्यांनी उभी करून ठेवलेली लाल रंगाची २० हजार रुपये किमतीची मोटरसायकल सदर ठिकाणी न आढळल्याने आपली मोटरसायकल चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात केली आहे.
Comments