ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स यूनियन तर्फे शिपिंग क्षेत्रातील चालू असलेल्या फसवणुकी विरोधात आंदोलन..
ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स यूनियन तर्फे शिपिंग क्षेत्रातील चालू असलेल्या फसवणुकी विरोधात आंदोलन
पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः  अनेक वर्षांपासून शिपिंग क्षेत्रातील चालू असलेल्या फसवणुकीला विरोध करण्यासाठी आज ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स यूनियन तर्फे बेलापुर नवी मुंबई मध्ये आंदोलन करण्यात आले.
वर्षानुवर्ष नवी मुंबई हे शिपिंग क्षेत्रात हे एक अग्रगण्य शहर आहे. येथे शिपिंग क्षेत्रातील प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था असून, अनेक शिपिंग कंपन्या आहेत. यातील बऱ्याच कंपन्या यांच्या कडे रिक्ररूटमेंट अँड प्लेसमेंट सर्विसेस लायसेन्स (RPSL) नसून सुद्धा अनेक वर्ष बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक करतात. तसेच काही कंपन्यांचे लायसेन्स हे डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग (DGS) यांच्या कडून रद्द करण्यात आले असून ते राजरोस कंपन्या चालवतात आणि बेरोजगरांची आर्थिक फसवणूक करतात.
या सर्व गोष्टी लक्षात घेता यावर अंकुश ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, यूनियन गेले तीन वर्षांपासून नितांत प्रयत्न करून देखील ह्या प्रकरणात घट दिसून येत नाही. रोज नवीन गुन्हे घडताना दिसतात. वारंवार पोलिस तक्रार करून देखील या गोष्टी बंद होत नाही, यंत्रणा कमी पडतात असे यूनियन अध्यक्ष संजय पवार यांचे स्पष्ट मत आहे. यापुढे यूनियन कडून #SAVE OUR SEAFARERS ही मोहीम चालवण्यात येणार आहे असे यूनियन कार्याध्यक्ष यांच्याकडून सांगण्यात आले. यूनियन तर्फे समाजप्रबोधन आणि जनजागृती करण्यात येईल आणि वेळ आल्यावर  आणखीन आक्रमक आंदोलन करण्यात येईल, त्याची संपूर्ण जवाबदारी प्रशासनाची राहील.
Comments