विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल दीर्घकालानंतर १९ फेब्रुवारी पासून पुनश्च सुरु..
विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल दीर्घकालानंतर १९ फेब्रुवारी पासून पुनश्च सुरु
मुंबई (प्रतिनिधी) : 
छत्रपती शिवाजी  महाराज स्मारक समिती संचालित (रजि.)  प्रमाणित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्ले - (पूर्व ) (ISO प्रमाणित),  हे संपूर्ण हिंदुस्तानाला परिचित आहे. कोरोनामुळे गेल्या २ वर्षांपासून प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल पूर्णपणे बंद होते. त्यामुळे गेल्या २ वर्षांपासून खेळाडूंना कोणत्याही क्रीडा प्रकाराचा सराव करता आला नाही. दरम्यान कोरोनाचे काही नियम शिथिल झाल्यामुळें १९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या) शुभदिनी  खेळाडूंसाठी पुनश्च  सुरू करण्यात आले, यामुळेच खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.   या सुवर्ण संधीचा लाभ खेळाडूंनी घ्यावा असे आवाहन अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी केले आहे .
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अनेक  आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेत पदक मिळवतात. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संकुलाच्या ७ खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात जलतरण, डायव्हिंग, जीम, जिमनॅस्टिक्स, आर्टीस्ट जिमनॅस्टिक्स, टेबल टेनिस, पिकल बॉल, स्केटिंग, आर्टीस्टीक्स स्केटिंग, तायक्वांदो, ज्युडो, कराटे, फुटबॉल, क्रिकेट, रायफल शूटिंग, बुद्धिबळ, कॅरम,मल्लखांब या खेळांचे राष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाते. या शिवाय झुंबा एरोबिक्स, भरतनाट्यम, ओडिसी नृत्य, आशिष माने इन्स्टिट्युट ऑफ डान्स फॉम, आर. झोन डान्स या कलांचेही प्रशिक्षण दिले जाते. तसेच (एसआरसी) मसाज, स्टीम, सोना बाथची सोयही आहेत. कोरोना नियमांचे पालन करून हे संकुल सुरू करण्यात आले आहे. 
संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू  आणि सचिव डॉ मोहन राणे संकुलाचे सर्व विश्वस्त तसेच प्रत्येक क्रीडा खेळाचे प्रशिक्षक यांचे मोलाचे सहकार्य मिळते. 
अधिक माहितीसाठी प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, शहाजीराजे मार्ग, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ५७ येथे तसेच खालील नंबर वर
संपर्क साधा  : ७७००९६७४२२ ,८१०४९७१०३७
८८६६५२६४९७, ०२२-२६८२७४६१
Comments