स्कुटी गाडीची पुढे जाणाऱ्या वॅगेनर गाडीस पाठीमागून धडक ; एक जखमी..
स्कुटी गाडीची पुढे जाणाऱ्या वॅगेनर गाडीस पाठीमागून धडक ; एक जखमी..

पनवेल, दि.10 (संजय कदम)- पनवेल जवळील कर्नाळा खिंड येथील खारपाडा ते पनवेल रस्त्यावर कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या समोर असलेल्या गतिरोधकाजवळ भरधाव स्कुटीवरील चालकाने त्याच्या पुढे चाललेल्या पाठीमागून ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात स्कुटीवर पाठीमागे बसलेले एक इसम जखमी जखमी झाला असून या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे.
          सौरभ भोजनी (वय-20) हा त्याच्या ताब्यातील स्कुटी घेऊन भरधाव वेगाने चालला असताना त्याने त्याच्या पुढे जाणाऱ्या वॅगेनर गाडीस पाठीमागून ठोकर मारून केलेल्या अपघातात त्याच्या स्कुटीवर पाठीमागे बसलेले ज्ञानेश्वर पाटील (वय-45) हे डोक्यास गंभीर दुखापत होऊन जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments