बंद ऑफिस मधील घरफोडीत हजारोचा ऐवज लंपास...
बंद ऑफिस मधील घरफोडीत हजारोचा ऐवज लंपास

पनवेल, / दि.30 (संजय कदम) ः  बंद ऑफिसच्या किचन रुमचा दरवाजा कडी-कोयंडा व ऑफिसच्या खिडकीला लावलेली लोखंडी ग्रील तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून रोख रकमेसह चांदीचे शिक्के, पितळी धातूच्या मुर्त्या व महत्वाची कागदपत्रे असा ऐवज चोरुन नेल्याची घटना कोन गावाच्या हद्दीत घडली आहे.
भृगुपती कामताप्रसाद मिश्रा (50) यांचे एकता बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सचे कोन गाव येथे कार्यालय असून त्या ठिकाणच्या किचनच्या रुमचा दरवाजा कडीकोयंडा व ऑफिसच्या खिडकीला लावलेली लोखंडी ग्रील तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून 50 हजार रुपये रोख रक्कम, चांदीचे शिक्के, पितळी धातूच्या हत्तीच्या दोन मुर्त्या व इतर महत्वाची कागदपत्रे असा मिळून जवळपास 64 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments