वाहनांच्या धडकेत मोटारसायकलीवरील दोघांचा मृत्यू व एक जखमी...
पनवेल दि.29 (वार्ताहर)- पनवेल जवळील तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये दिपक फर्टिलायझर्स कंपनीच्या पाठीमागील बाजूस रस्त्यावर झालेल्या अपघातात मोटारसायकलीवरील तिघांपैकी दोघांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर आहे.
सदर रस्त्यावरून हे तिघे जण जात असताना एका वाहनाची धडक मोटारसायकलीला बसल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलीवरील दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाल्याचे समजते. या अपघाताची माहिती मिळताच तळोजा पोलिस व वाहतूक शाखेची पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. तिघेही जण पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.