शिवसेनेच्या दणक्यानंतर पथदिवे झाले सुरू....
शिवसेनेच्या दणक्यानंतर पथदिवे झाले सुरू....
पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः कळंबोली वसाहतीमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावरचे पथदिवे बंदावस्थेत होते. या संदर्भात शिवसेनेने सिडकोला दणका दिल्यानंतर पुन्हा पथदिवे सुरू झाल्याने परिसर उजळला आहे.
जिल्हाप्रमुख शिरीष घरत व महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली आणि विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर व शहर प्रमुख डी.एन.मिश्रा व उपमहानगर समन्वयक आत्माराम गावंड यांच्या मार्गदर्शनाने कळंबोली शहर समन्वयक गिरीष धुमाळ व विभाग प्रमुख आकाश शेलार, दिपक कोडवते तर्फे सिडकोकडे बंद पथदिवे सुरू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाची तात्काळ दखल घेत सिडको अभियता यांने सेक्टर 1, 2ई, 3ई, 4ई, 6, 10 येथील रस्त्याच्या पथदिव्याची  दुरुस्ती पूर्ण करून घेतले व त्यावेळी उपस्थित स्थानिक रहिवाश्यांनी कळंबोली शिवसेनेचे व शहर समन्वयक गिरीश धुमाळ आणि पदाधिकारी यांचे आभार मानले. 
या प्रसंगी दीपक कोडवते, शिवकुमार यादव ऊर्फ (राजू ), सुमित सूर्यवंशी, तेजस धादवड, विष्णू दडस शिवसैनिक उपस्थित होते. तसेच मागणी नुसार कामाला सुरुवात केल्याबद्दल कळंबोली  शिवसेने तर्फे सिडको अभियंता कांबळे व अनिल मेटकरी, जगदीश शेळके, यांचे आभार मानले.फोटो ः शिवसेनेच्या प्रयत्नामुळे पथदिवे उजळले.
Comments