प्लॅस्टिक गोणी बॅगची डिलेव्हरी न घेता केली जवळपास ४५ हजारांची फसवणूक...
प्लॅस्टिक गोणी बॅगची डिलेव्हरी न घेता केली जवळपास ४५ हजारांची फसवणूक...

पनवेल दि. २४ (संजय कदम)- काजूचा व्यापारी असल्याचे भासवून १ हजार प्लॅस्टिक गोणी बॅगची ऑर्डर देऊन सदर ऑर्डरची डिलेव्हरी हि एका बंद गाळ्यात घेऊन व मालाचे पैसे न देता फसवणूक केल्याची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
             सचिन सावंत यांचा प्लॅस्टिक गोणी बनविण्याचा कारखाना असून त्यांना आरोपी विपूल जैन याने जवळपास १ हजार प्लॅस्टिक गोणी बॅगची ऑर्डर दिली होती व सदर ऑर्डरची डिलेव्हरी अस्तित्वात नसलेल्या हायटेक शिपींग इंडस्ट्रीज फॅक्टरी या पत्त्यावर न घेता पावसाचा बहाणा करून या गुन्ह्यातील इतर दोन आरोपींनी तालुक्यातील तोंडरे गाव येथील गाळा नं- 71/50 लोटलीकर कंपाऊंड या बंद गाळ्यात डिलेव्हरी घेतली व मालाचे पैसे न देता आपसात संगनमत करून सचिन सावंत यांची जवळपास 45 हजारांची फसवणूक केल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments